Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Charholi TP scheme : मुख्यमंत्र्यांचा आदेश अन् प्रशासनाची “तालीम”

चऱ्होलीची टीपी स्कीम रद्दच्या प्रस्तावाला मान्यता

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार प्रशासक शेखर सिंह यांची कार्यवाही

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार बुधवारी पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाने मौजे चऱ्होली येथील TP scheme बाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

महानगरपालिका प्रशासनाने लादलेली TP Schem अखेर रद्द झाली असून, ग्रामस्थ तसेच भूमिपुत्रांना यामुळे एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने चिखली आणि मौजे चऱ्होली येथे नवीन नगर योजना प्रस्तावित ठेवली. या TP scheme संदर्भात मोठा रोष पाहायला मिळाला. ग्रामस्थ भूमिपुत्र यांनी “करो या मरो” असा पवित्र घेत टीपी स्कीम बाबत विरोध दर्शवला होता.

भूमिपुत्रांचा विरोध लक्षात घेत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी या संदर्भात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या समवेत बैठक घेतली होती. यामध्ये आमदारांनी ग्रामस्थ तसेच भूमिपुत्रांच्या भावना, या परिसरात आतापर्यंत झालेले भूसंपादन त्यामुळे भूमिपुत्रांवर झालेला अन्याय सविस्तरपणे मांडला होता. मात्र, दरम्यानच्या काळात चिखली येथील टीपी स्कीम रद्द करण्यात आली. तर दुसरीकडे मौजे चऱ्होली येथील टीपी स्कीमचा निर्णय स्थगिती असा ठेवलेला होता. या विरोधात ग्रामस्थ भूमिपुत्र यांचा प्रचंड रोष होता.

हेही वाचा – जयंत पाटलांनी घेतली उदय सामंतांची भेट! तब्बल दीड तास खलबत

आज महापालिका विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आमदार महेश लांडगे यांनी हा मुद्दा छेडला. भूमिपुत्रांवर भूसंपादनाच्या बाबत झालेला अन्याय त्यांनी स्पष्टपणे मांडला. याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यासपीठावरूनच प्रशासनाला ही टीपी स्कीम रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच, भूमिपुत्रांना डावलून कोणताही विकास आम्हाला करायचा नाही, असे देखील स्पष्टपणे सांगितले.

चऱ्होली टीपी स्कीम अखेर रद्द…

भूमिपुत्र ग्रामस्थ यांचा टीपी स्कीम बाबत वाढलेला रोष लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नगररचना विभागाने बुधवारी सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्तावित टीपी स्कीम रद्द करावी असा प्रस्ताव प्रशासक आयुक्त शेखर सिंह यांच्या समोर ठेवला होता. आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार अखेर चऱ्होली टीपी स्कीम रद्द केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

मौजे चिखली आणि चऱ्होलीत महानगरपालिका प्रशासनाने लादलेली TP Schem रद्द करण्याबाबत आम्ही संघर्षाची तयारी ठेवली. राज्य शासनाशी देखील पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर हा विषय मांडला. भूमिपुत्रांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही ही माझी ग्वाही होती तो ‘शब्द’ मी आज पाळला आहे. मौजे चिखली आणि चऱ्होली तील टीपी स्कीम रद्द करण्यात आली आहे.

– महेश लांडगे,आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button