जयंत पाटलांनी घेतली उदय सामंतांची भेट! तब्बल दीड तास खलबत

Jayant Patil : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे.
जयंत पाटील आणि उदय सामंत यांच्या तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील नरीमन पॅाईट येथील एक्सप्रेस टॅावरमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरूनच ही भेट झाल्याची माहिती आहे. या भेटीत काय राजकिय चर्चा झाली याची माहीती अद्याप गुलदस्त्यातच आहे.
हेही वाचा – वरंध घाट 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद
सध्याच्या विविध मुद्यावरुन तापलेल्या राजकीय वातावरणात या दोन्ही नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचे तपशील अद्यापही समोर आलेला नाही.
दरम्यान, गेल्या महिन्यात जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट झाली होती. मागील एका महिन्यांतील या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची ही दुसरी भेट होती. रात्री उशिरा मुंबईत ही त्यांची भेट झाली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान, एका बाजुला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आता दुसऱ्या बाजुला महायुतीतील महत्त्वाच्या पक्षाच्या प्रमुखाची आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या राज्याच्या प्रमुखांची भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.





