ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Alandi Crime: दोन लाखांच्या वादातून रिक्षाचालकावर खंजीराने हल्ला!

आळंदीतील पीएमटी चौकात तिघांकडून २२ वर्षीय तरुणावर वार; खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

आळंदी | दोन लाख रुपये उसनवारीने दिलेल्या पैशांच्या वादातून तिघांनी मिळून एका २२ वर्षीय रिक्षाचालकावर धारदार खंजीराने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना आळंदी येथे घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर दत्ता बडे (वय २२, व्यवसाय रिक्षाचालक) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. १३ नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पीएमटी चौकातील नगरपरिषद इमारतीसमोरील कमानीजवळ ही घटना घडली.

हेही वाचा

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियात मोठा बदल! कुलदीप यादव संघाबाहेर, तर गुरनूर ब्रारची संघात एन्ट्री

सागर बडे हे आपल्या ताब्यातील ऑटो रिक्षा (एमएच १२ एलएम ४६०३) घेऊन व्यवसायासाठी थांबले होते. त्यावेळी आरोपी पिल्या ऊर्फ आर्यन नागोराव पंडित (वय २०), नव्या ऊर्फ नवनाथ जाधव (वय १९) आणि वैभ्या ऊर्फ वैभव व्यवहारे (वय २०) हे तिघे तेथे आले.

मुख्य आरोपीला दोन लाख रुपये रोख उसनवारीने दिले होते. मात्र, या पैशांच्या वादातून मनात राग धरून तिघांनी संगनमताने सागर यांच्याशी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी करत आरोपींनी हातातील लोखंडी खंजीर आणि धारदार शस्त्राने सागर यांच्या पोटावर, डोक्यावर तसेच शरीराच्या इतर भागांवर सपासप वार केले. या हल्ल्यात त्यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group