ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
चंद्रकांत दांगट पाटील यांचे निधन
पिंपरी चिंचवड | किवळे, विकासनगर येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत सहादु दांगट पाटील ( वय 69) यांचे अल्पशा आजाराने कार्तिकी एकादशी दिवशी सोमवारी (दि.15 नोव्हे.) सायंकाळी निधन झाले. रात्री आठच्या सुमारास किवळे येथील पवना नदीकाठी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.युवा नेते सचिन दांगट पाटील, ऍड. रेखा कारंडे, डॉ. हेमलता साकोरे यांचे ते वडील होत. शिवसेनचे माजी विभागप्रमुख रोहिदास दांगट, शिवशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष आबा दांगट, दुर्गादेवी उत्सव समितीचे खजिनदार राजेश दांगट व पयार्वरण प्रेमी संजय दांगट यांचे ते चुलते तसेच शिवसेना महिला आघाडीच्या चिंचवड विधानसभा संघटक पल्लवी दांगट यांचे ते चुलत सासरे होत.