खासगी कोचिंग क्लासेसवर केंद्र सरकारचा ‘अंकूश’
नवी नियमावली जाहरी; १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेश नाही
![Central government announced new rules for private coaching courses](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-Image-2024-01-19-at-12.41.13-780x470.jpeg)
पिंपरी | खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभारावर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. खासगी कोचिंग क्लासेसची व्याख्या देखील नव्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आली आहे.
विविध प्रकारची आमिष दाखवून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा सपाटा सध्या खासगी क्लासेसकडून सुरू असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी प्रलोभने देऊन गुणवत्तेशी तडजोड केली जाते. परिणामी विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येते. त्यामुळे केंद्र सरकारने खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभारावर अंकुश लावण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
हेही वाचा – सहावी खेलो इंडिया युथ गेम्स; कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे दोन्ही संघ पराभूत
केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांच्या अनुसार १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही. त्यामुळे किमान दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे. या नियमामुळे १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या क्लासेसचा प्रश्न उपस्थित होणार आहे. रँक, गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची गॅरंटी कोचिंग क्लासेसना देता येणार नाही.
नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खासगी कोचिंग क्लासेसची व्याख्या केली आहे. ज्या जागेत ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते, त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल. हल्ली कोणीही कोणत्याही परवानगी शिवाय खासगी कोचिंग क्लासेस सुरू करत आहे.
यापुढे कुणालाही खासगी कोचिंग क्लासेस सुरू करता येणार नाहीत. खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालकांना विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करता येणार नाही.