केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारंभ साजरा.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Image-2021-08-15-at-4.53.33-PM.jpeg)
पिंपरी-चिंचवड | 75व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल आकुर्डी मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी समारंभ अतिशय उत्साहात साजरा झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे व श्री. शिवछत्रपती पुरस्कार विजेते मा. श्री.संजय टकले, शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.श्री. धनंजय वर्णेकर, सचिव ज्ञानेश्वर काळभोर, संचालक श्री राम रैना, संचालिका सौ.शितल ताई वर्णेकर ,विश्वस्त सौ. राजश्रीताई काळभोर, उपप्राचार्या सरबजीत कौर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ पार पडला.
शाळेच्या कमांडो विद्यार्थ्यांनी पथसंचलन करीत राष्ट्रध्वजाला व उपस्थितांना मानवंदना दिली.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार व स्वागत करून शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी विविध देशभक्तीपर गीते, नृत्ये , भाषणे, नाटिका सादर केल्या. राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, अशा वेशभूषेत उपस्थित विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांचे विचार उपस्थितांसमोर व्यक्त केले.देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे व स्वतःचे नाव उंचावत असताना माणुसकीचे तत्व कधीच विसरू नये असा बहुमूल्य विचार प्रमुख पाहुणे श्री विजय टकले यांनी व्यक्त केला.
संस्थापक अध्यक्ष श्री वर्णेकर यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात आहुती देऊन जाज्वल्य राष्ट्रभक्ती दाखवणाऱ्या स्वातंत्र्य वीरांचे स्मरण करीत आधुनिक भारताच्या जबाबदाऱ्यांची जाणीव उपस्थितांना करून दिली.कोरोना रुपी महाभयंकर आपत्तीचा सामना देखील भारत आज बलशाली राष्ट्राच्या राजमार्गावर धावत असल्याचे गौरवोद्गार उपप्राचार्या सरबजीत कौर यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तिरंगी रंगात मेणबत्त्या तयार करणे, फेमलेस कुकिंग, राखी मेकिंग, राष्ट्र पुरुषांची वेशभूषा इत्यादी विविध उपक्रम साजरी केले, त्याची झलक ग्लिम्फस च्या माध्यमातून उपस्थितांना दाखवण्यात आली.या संपूर्ण जाज्वल्यपूर्ण व देशभक्ती च्या वातावरणात साजऱ्या झालेल्या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने करण्यात आली. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्वेता गुर्जर व सारिका मुंदडा यांनी केले. शाळेच्या इवेंट कमिटीने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.