ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे ते शिवनेरी सायकल प्रवास करून स्वातंत्र्यदिन साजरा ; इन्डो अथलेटिक्स सोसायटीचा उपक्रम

पिंपरी चिंचवड  | भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 14 ऑगस्ट रोजी आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य संस्था इन्डो अथलेटिक्स सोसायटी यांनी पुणे- शिवनेरी- पुणे असे 240 किलोमीटर सायकल प्रवास करून स्वातंत्र्यदिन साजरा केला. यामध्ये 175 सायकलस्वारांनी सहभाग घेतला.निगडी, भक्ती शक्ती येथून सर्व 175 सायकलस्वार पहाटे पाच वाजता निघाले. सीए कृष्णलाल बंसल, उद्योजक अण्णारे बिरादार, आयएमएचे डॉ. सुहास माटे, रेल्वे अधिकारी ऋषिकेश पोटे, आयएएस चे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ यांच्या झेंडा दाखवून सायकल प्रवास सुरू झाला. सर्व सायकल स्वार 120 किलोमीटर अंतर पार करून 6 तासांत शिवनेरी येथे पोहोचले.

वाटेत राजगुरुनगरचा घाट आणि नारायणगावचा चढ सर्व सायकल स्वारांनी लीलया पार केला. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू सायकलींग असोसिएशन तर्फे सर्वांना नाष्टाचे आयोजन करण्यात आले. एचआरएसए चे प्रतिनिधी निलेश काळे, सुनील धुमाळ सर व रवी चंदन यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

पुणे, पिंपरी-चिंचवड अशा विविध ठिकाणाहून सायकल राईड मध्ये भाग घेतला. शिवनेरी येथील साई संस्थानचे धनंजय माताडे, शिवनेरी ॲथलेटिक्स असोसिएशनचे प्रशांत गुंजाळ, सुनील इचके, ओझर अष्टविनायक संस्थांचे प्रमुख विश्‍वस्त गणेश कवडे यांनी सर्व सायकल स्वरांचे उत्साहाने स्वागत केले व शिवनेरी येथील सर्व व्यवस्थापन पाहिले असे इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे संस्थापक सदस्य गजानन खैरे यांनी सांगितले.

शिवनेरी रायगड नियोजनामध्ये इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे रमेश माने, श्रीकांत चौधरी, गिरीराज उमरीकर, अमित पवार, नागेश सलियन, अजित गोरे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button