पिंपरीतील कोरोना पॉझिटिव्ह अन घरीच उपचार घेत असलेल्या रुग्णांना मुंबईतून कॉल!
![Call from Mumbai to patients undergoing corona positive and home treatment in Pimpri!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/200110131316121e.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरात आढळून येणाऱ्या कोरोना रूग्णांमध्ये बहुतांश रूग्णांना सौम्य लक्षणे आहेत. परिणामी, सर्वाधिक रूग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. महापालिकेने रूग्णांची दिवसातून एक वेळा दुरध्वनी करून औषधोपचाराची माहिती घेण्यासाठी कॉल सेंटरची स्थापना केली असून हे कॉल सेंटर चालविणा-या संस्थेला प्रति कॉलसाठी 13 रूपये देण्यात येत आहेत.या संस्थेचे काम मुंबईतून चालत असून प्रत्यक्षात गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रूग्णांना कॉल येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे रूग्णांना खरच कॉल जातात की फक्त कागदोपत्री कॉल दाखवले जातात असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहरात गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या काही रूग्णांना कोणत्याही प्रकारचा कॉल आलेला नाही. गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रूग्णांना दिवसातून एक वेळा तरी फोन करून औषधोपचाराची माहिती घ्यावी. तसेच रूग्णांना कोणती लक्षणे आहेत. या रूग्णांशी डॉक्टरांनी संवाद साधावा यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. ज्या रूग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशाच रूग्णांना गृहविलगीकरणात उपचार दिले जात आहेत.