कै. मधुकर पवळे उड्डाणपुलाच्या रंगरंगोटी, सुशोभीकरणाला सुरुवात
![Preparations for municipal elections! Provision of Rs. 15 crore for elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/pcmc.jpg)
नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये अस्तित्वात असलेल्या कै. मधुकर पवळे उड्डाणपुलाच्या रंगरंगोटी, सुशोभीकरणाला सुरुवात झाली आहे. यासाठी स्थानिक नगरसेवक, क्रीडा समितीचे सभापती उत्तम केंदळे यांनी पाठपुरावा केला होता.
उड्डाणपुलाच्या काही विकासकामे करणे गरजेचे होते. त्यानुसार या उड्डाणपुलाची रंगरंगोटी व सुशोभीकरण करून घेण्यात यावी. तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखीसोहळा मार्ग असल्याने पुलाच्या खालील बाजूस चांगल्या प्रकारचे अभंग, भिंती चित्रके अनेकविध सांप्रदायिक सुशोभीकरण करून देण्यात यावे. तसेच उड्डाणपुलाच्या खालील संपूर्ण भागात अत्याधुनिक पद्धतीने विद्युत रोषणाई सुद्धा करून द्यावी. यासाठी नगरसेवक व क्रीडा, कला,साहित्य व सांस्कृतिक सभापती उत्तम केंदळे हे अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला आता यश आले असून उड्डाणपुलाच्या रंगरंगोटी व सुशोभीकरणाला तसेच विद्युत रोषणाई अशी दोन्ही कामांची सुरुवात झाली आहे.
नगरसेवक केंदळे म्हणाले, कै. मधुकर पवळे उड्डाणपूल हा पिंपरी-चिंचवड शहरातील एक महत्त्वाचा उड्डाणपूल आहे. मागील पंधरा वर्षापासून कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी सुशोभीकरण व रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. भक्ती-शक्ती कडून येणारा रस्ता, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून येणारा रस्ता, प्राधिकरणकडून येणारा रस्ता तसेच थरमॅक्स चौकाकडून येणारा रस्ता हे चार रस्ते या ठिकाणी जोडले गेले असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहनांची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. येथे धूम्रपान करणाऱ्या मुळे अस्वच्छता निर्माण झाली होती. तेथील रंगरंगोटी व सुशोभीकरणाचे काम चालु झाल्यामुळे येथील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.