breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पीएमपीएमएलकडून बसमार्ग डेक्कन जिमखाना ते पिंपळे निलख पूर्ववत सुरू

पिंपरी : पीएमपीएमएल कडून बसमार्ग क्रमांक 93 – डेक्कन जिमखाना ते पिंपळे निलख हा बसमार्ग प्रवाशी मागणीनुसार पूर्ववत सुरू करण्यात आला असून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि.15) आमदार  अश्विनी जगताप यांच्या हस्ते या बसमार्गाचे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष शंकरराव जगताप, सचिन साठे, नितीन इंगवले व बालेवाडी डेपो मॅनेजर  सुनील दिवाण तसेच  ज्येष्ठ नागरीक संघटनेचे अध्यक्ष सुरेश साठे, रामदास जगदाळे,  बाळासाहेब इंगवले, राजेंद्र टकले, अशोक शिंदे,जयवंत रानवडे, बाळासाहेब कामठे,  भुलेश्वर नानगुडे, काळूराम नानगुडे, अनिल संचेती, श्री. आनंद कुंभार, प्रकाश कामठे,  लक्ष्मण दळवी,  शिवाजीराव दळवी यांच्यासह पिंपळे निलख परिसरातील नागरीक उपस्थित होते.

हेही वाचा      –      ‘राज्यात सध्या तीन घाशीराम कोतवालांचं सरकार’; संजय राऊतांची टीका

बसमार्ग क्रमांक 93  – डेक्कन जिमखाना ते पिंपळे निलख या बससेवेचा मार्ग फर्ग्युसन कॉलेज, मनपा काँग्रेस भवन, सिमला ऑफिस, पुणे विद्यापीठ गेट, कस्तुरबा गांधी वसाहत, औंध गांव, औंध हॉस्पिटल, रक्षक चौक असा असणार आहे. या बसमार्गावर पिंपळे निलख ते डेक्कन जिमखाना 8 फेऱ्या व डेक्कन जिमखाना ते पिंपळे निलख 8 फेऱ्या अशा एकूण 16 फेऱ्या होणार आहेत.

पिंपळे निलख हून पहिली फेरी सकाळी 6.15 वाजता. तर शेवटची फेरी संध्याकाळी 7.20 वाजता आहे. तसेच डेक्कन जिमखाना पहिली हून पहिली फेरी सकाळी 7 वाजता. तर शेवटची फेरी रात्री 8.45  वाजता आहे. तरी या बससेवेचा लाभ नोकरदार, कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक व महिला प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button