Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी!
शिक्षण विश्व: ऑलिम्पियाड 38 विद्यार्थ्यांनी मिळवले गोल्ड मेडल

पिंपरी- चिंचवड : गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूलमधील २०२४-२५ मध्ये इंग्लिश ऑलिम्पियाड मध्ये ५, सायन्स ऑलिम्पियाड मध्ये ११ व मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये २२ विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले आहे. या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळत आहे
हेही वाचा – फॉर्मुला भारत या राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईच्या टीम क्रेटॉसचा चौथ्यांदा विक्रमी विजय
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामागे अध्यक्ष विनायक भोंगाळे आणि शिक्षकांचे कष्ट असल्याची भावना व्यवस्थापकीय संचालिका कविता कडू पाटील यांनी व्यक्त केली. संस्थेच्या विश्वस्त सरिता विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी , सर्व मुख्याध्यापक-उपमुख्याध्यापक, शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.