breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवड

ब्रेकिंग न्यूज: पिंपरी चिंचवड़ पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली, विनयकुमार चौबे पिंपरी चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड़ पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागेवर विनयकुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ IPS अधिकारी विनयकुमार चौबे मुंबईत कायदा व सुव्यवस्था सह पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असतानाच, त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) पदावर नुकतीच बढती मिळाली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक. विनयकुमार चौबे यांची आता पिंपरी-चिंचवडचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे कायदा- सुव्यवस्था राखण्यात यशस्वी कामगिरी केलेले चौबे आता पिंपरी-चिंचवडमधील कायदा-सुव्यवस्था राखण्यात कशाप्रकारे यशस्वी होताहेत, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरण अंकुश शिंदे यांना भोवलं असल्याची चर्चा पोलिस आयुक्तालयाच्या वर्तुळात रंगली आहे. गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी शिंदे यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.

अंकुश शिंदे यांची तडकाफडकी बदली का झाली…

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर पिंपरी-चिंचवड येथे समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्याने शाई फेकली होती. पोलिसांची सुरक्षा भेदून समता दलाचे कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी थेट पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. शाईफेक प्रकरणात ११ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. यामध्ये ८ पोलीस कर्मचारी आणि तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. या प्रकरणात पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना देखील दोषी ठरविण्यात आले होते. तर शाईफेक करणार्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल न करता त्यांना सोडण्यात यावे, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत होती. या घटनेच्या पार्श्वभूमिवर अंकुश शिंदे यांची तडकाफडकी बदली होणे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरण अंकुश शिंदे यांना भोवलं असल्याची चर्चा पोलिस आयुक्तालयाच्या वर्तुळात सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button