ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि पीसीईटीच्या वतीने रविवारी गुणवंतांचा सत्कार

शिक्षण विश्व : दहावी, बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा होणार गौरव

पिंपरी-चिंचवड | आकुर्डी येथील खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीइटी) यांच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी डॉ. शितल कुमार रवंदळे हे १० वी, १२ वी नंतरचे करिअर याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी (दि. ७ जून) रोजी सायंकाळी ५ वाजता, आकुर्डी, श्री खंडोबा सांस्कृतिक भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव पांढरकर आणि पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

यावेळी उपाध्यक्ष विधानसभा अण्णा बनसोडे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, खजिनदार शांताराम गराडे, खंडोबा देवस्थान ट्रस्ट खजिनदार गोविंद काळभोर, माजी उपमहापौर पिंपरी दिनकरराव दातीर पाटील, कला क्रीडा विभाग सभापती कैलास कुटे, नगरसेवक प्रमोद कुटे, वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे, कामगार नेते राजन नायर आणि खंडोबा देवस्थान ट्रस्ट सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा

‘मन की बात’मध्ये दोन-तीन उद्योगपतींनाच मोठं करायचं असतं; राज ठाकरेंचा थेट पंतप्रधान आणि अदानींवर निशाणा

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका झेरॉक्स प्रत श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट कार्यालयात दि. ५ जून, सकाळी १० ते दुपारी १ किंव्हा सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत जमा करावी असे आवाहन खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button