Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
भाजपा उद्योग आघाडीतर्फे सेवा उद्योग परिसंवादाचे आयोजन
![BJP Industry Front organizes service industry seminar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/33415af3-ea5e-4b63-bad1-a974fe5a1961.jpg)
- उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष निखिल काळकुटे यांची माहिती
- ‘एमएसएमई ‘ माहिती व मार्गदर्शनासाठी मान्यवरांची उपस्थिती
पिंपरी । प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने सेवा उद्योग परिसंवाद आणि एम.एस.एम.ई. विषयी माहीती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १० ऑक्टोंबर हा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती भाजपा उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष निखिल काळकुटे यांनी दिली आहे.
निखल काळकुटे म्हणाले की, हॉटेल कलासागर, नाशिक फाटा येथे सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष व कोथरुड विधानसभा मतदारसंघ आमदार चंद्रकांत पाटील, भाजपा उद्योग आघाडी प्रदेश अध्यक्ष व नॅशनल बोर्ड ऑफ एम.एस.एम.ई. सदस्य प्रदिप पेशकार ,भाजपा शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख मार्गदर्शक तथा आमदार महेश लांडगे, भाजपा संघटन मंत्री श्रीकांत भारतीय आदी उपस्थित राहणार आहेत.