डब्बू आसवानी यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल
मिशन- PCMC : कोणताही दिखावा न करता ते सायकलवरून निवडणूक कार्यालयात

पिंपरी-चिंचवड: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्र. २१ येथील अधिकृत उमेदवार श्री हीरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना त्यांनी पर्यावरणपूरक आणि साधेपणाचे उदाहरण ठेवले; कोणताही दिखावा न करता ते सायकलवरून निवडणूक कार्यालयात आले.
यावेळी डब्बू आसवानी यांच्या सोबत श्री. संदिप बाळकृष्ण वाघेरे, निकिता अर्जुन कदम आणि सौ. प्रियांका कुदले उपस्थित होते. त्यांच्या या अनोख्या कृतीमुळे उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले गेले आणि सर्वत्र कौतुकाची चर्चा सुरू झाली.
हेही वाचा – भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला, हे कशामुळे शक्य झालं?

परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांच्या प्रतिसादातून असे जाणवले की, डब्बू आसवानी यांनी मागील कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, युवकांसाठी उपक्रम आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या विकासकामांमुळे जनतेमध्ये विश्वास प्रस्थापित केला आहे. साधेपणा, पारदर्शकता आणि विकासाचा ठाम अजेंडा घेऊन डब्बू आसवानी पुन्हा प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“विकास म्हणजे फक्त शब्दातले वचन नसते; तो प्रत्येक रस्त्यात, प्रत्येक पाण्याच्या थेंबात आणि प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात प्रत्यक्ष अनुभवायला हवा. माझा प्रयत्न नेहमी जनतेसाठी, जनतेबरोबर असेल. साधेपणा, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर आधारित नेतृत्वच खरं बदल घडवते. मी फक्त आश्वासने देत नाही, प्रत्यक्ष कामातून जनतेचा विश्वास जिंकतो.
– डब्बू आसवानी, उमेदवार, राष्ट्रवादी, प्रभाग- 21.




