इंद्रायणी नगर प्रभाग क्र.८ मध्ये भाजप उमेदवारांची प्रचारात आघाडी
मिशन-PCMC: नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विकासाचे व्हीजन

पिंपरी-चिंचवड: इंद्रायणी नगर प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पार्टी व आरपीआय (आठवले गट) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–आरपीआय (आठवले) पक्षाचे अधिकृत सुशिक्षित उमेदवार (अ) डॉ. सुहास लक्ष्मण कांबळे, (ब) सौ. नम्रता योगेश लोंढे, (क) सौ. निलम शिवराज लांडगे आणि (ड) श्री. मडिगेरी विलास हनुमंतराव यांनी विविध भागांत प्रचार दौरा केला. सेक्टर क्रमांक १ येथील महाराष्ट्र कॉलनी परिसर, वैष्णो माता कॉलनी, रामतीलक सोसायटी सर्कल तसेच बँक ऑफ महाराष्ट्र सर्कल या भागांमध्ये हा प्रचार दौरा उत्साहात पार पडला.
हेही वाचा – सरकारचं पुण्याला मोठं गिफ्ट! पुणे- अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर संरक्षण कॉरिडॉरसह ‘जीसीसी हब’
यावेळी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. नागरिकांचे प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद हेच आमचे खरे बळ असल्याची भावना चारही उमेदवारांनी व्यक्त केली. तसेच इंद्रायणी नगर व इंदिरानगर परिसराचा सर्वांगीण विकास हा भाजपचा प्रमुख ध्यास असल्याचा विश्वास उमेदवारांनी मतदारांसमोर मांडला. या विकासाच्या भूमिकेला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत चारही उमेदवार भाजपाचेच विजयी होतील, अशी ग्वाही दिल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




