Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड
आमदार रोहित पवार यांच्या ‘युवा संघर्ष’ यात्रेला पाठिंबा देण्यासाठी बाईक रॅली
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुषार कामठे यांचा पुढाकार
![Bike rally to support MLA Rohit Pawar's 'Yuva Sangharsh' Yatra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/NCP-Yuva-Sangharsh-1-780x470.jpg)
पिंपरी : आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला पिंपरी चिंचवड मधून पाठिंबा देण्यासाठी पाचशे बाईकची रॅली काढण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पिंपरी वाघेरे येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून बाईक रॅलीला सुरुवात केली. नंतर ही रॅली पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुढे दापोडीवरून लाल महाल येथे गेली. तिथे रॅली युवा संघर्ष यात्रेला जाऊन सामील झाली.
यावेळी माजी नगरसेविका सुलक्षणा धर, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, देवेंद्र तायडे, राजन नायर, काशिनाथ जगताप, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, राहुल आहेर,पोपट पडवळ, योगेश सोनावणे, सुदाम शिंदे, ऍड संतोष शिंदे, अनिल भोसले, संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.