मोठी बातमी : पिंपरी- चिंचवडमधील राजकीय “बेरीज” सुरू; अपक्ष गटनेते कैलास बारणे राष्ट्रवादीत दाखल!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/IMG-20210916-WA0030.jpg)
– सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का
– अन्य ८ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात : अभय मांढरे
मुंबई |प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अपक्ष गटनेते कैलास बारणे यांनी आज राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “राजकीय बेरीज” सुरू केली असून, “मॅजिक फिगर” च्या दिशेने घोडदौड सुरू झाली आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष कार्यलय, मुंबई येथे कैलास बारणे यांनी आपल्या हातावर घड्याळ बांधले.
यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) चे शहराध्यक्ष शसंजोग वाघेरे- पाटील), माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, अजित प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अभयशेठ मांढरे, माजी नगरसेवक सतीशदादा दरेकर, कुंभार समाजोन्नती मंडळचे अध्यक्ष ऋषिकेश काशिद, योगेश साळुंखे, प्रविण बारणे, शहाजी लोखंडे, अक्षय बारणे, तुषार मोरे आदी उपस्थित होते.
२०१७ मध्ये पिंपरी- चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर अपक्ष आघाडीच्या ५ नागरसेवकांनी कैलास बारणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला पाठिंबा दिला होता. आता बारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील म्हणाले की, भाजपामध्ये नाराजांची संख्या मोठी आहे. आगामी काळात अनेकजण राष्ट्रवादीत येणार आहेत. याबाबत सविस्तर भूमिका मांडण्यासाठी मी प्रसारमाध्यमांशी आज दुपारी संवाद साधणार आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/IMG-20210916-WA0024.jpg)