मोठी बातमी : मराठवाडा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
![Big news: Founder President of Marathwada Vikas Sangh Arun Pawar joins NCP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/ncp-pcmc.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
मराठवाडा जन संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भाजपा सह्याद्री आदिवासी मंडळाचे विष्णू शेळके, मोशीतील भाजपचे युवक कार्यकर्ता ज्ञानेश्र्वर बोऱ्हाडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात आज, गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोगभाऊ वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, पक्षाचे शहर मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एकजुटीने पक्ष संघटन वाढविण्यासाठी काम करण्याच्या सूचना केला. पक्ष प्रवेश घेतलेल्या नेते, कार्यकर्त्यांनी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळवून देण्यासाठी झोकून देऊन काम करण्याचा विश्वास त्यांनी अजितदादांना यावेळी दिला.