भोसरीने महाराष्ट्राला दमदार कुस्तीपटू दिले.. भोसरीचा यात्रा उत्सव म्हणजे क्रीडा पर्वणीच : आढळराव पाटील
भोसरी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे बैलगाडा आणि दुसरीकडे कुस्ती आखाडा
![Bhosari gave strong wrestlers to Maharashtra. Bhosari's yatra festival is a sports festival itself: Adhalrao Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Bhosari--780x470.jpg)
शिरूर : शिरूर लोकसभेतुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकतीच भोसरी गावच्या यात्रा उत्सवात कुस्ती आखाड्यात हजेरी लावली. यावेळी भोजापूर येथील कुस्ती आखाडा येथे भोसरी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा निमित्त आयोजित कुस्तीचे थरार अनुभवले. प्रचंड संख्येने उपस्थित कुस्ती शौकिनांनी आढळराव पाटील यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी आढळरावांना कुस्तीप्रेमी नागरिकांशी संवाद साधताना म्हंटले की, भोसरी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे बैलगाडा आणि दुसरीकडे कुस्ती आखाडा. महाराष्ट्राला अनेक दमदार कुस्तीपटू भोसरी गावाने दिले आहे. कुस्ती हा आपला ग्रामीण भागातला रांगडा खेळ आहे. मातीशी असलेली घट्ट नाळ भोजापुर नागरीने आजही टिकवून ठेवली आहे, याचा अभिमान आहे म्हणूनच भोसरीची यात्रा म्हणजे सर्व नागरिकांसाठी क्रीडा पर्वणीच असते.
याप्रसंगी आमदार महेश दादा लांडगे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राकाँपा अजित गव्हाणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विजू फुके, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, समन्वयक महायुती भोसरी दत्तात्रय, शिवसेना समन्वयक आबा लांडगे, भालेराव, नगरसेवक जालिंदर शिंदे, नगरसेवक नितीन शेठ लांडगे, मुंबई महापौर केसरी कोच अजय लांडगे, वस्ताद रंगनाथ साधू फुगे, उत्सव कमिटी प्रमुख पंडित गवळी, भानुदास फुगे, शामराव फुगे, नारायण गव्हाणे, शिवाजी लांडगे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.