रावेत किवळे प्रभागामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन

पिंपरी : रावेत प्रभागातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन मा: अश्विनीताई जगताप (आमदार चिंचवड विधानसभा) आणि श्री. शंकर जगताप (शहराध्यक्ष,भाजपा पिंपरी चिंचवड, शहर(जिल्हा) यांच्या हस्ते पार पडले. रावेत गावच्या ग्रामदैवत श्री धर्मराज महाराज मंदिर व परिसरातील मंदिरांच्या जीर्णोद्धार व नूतनीकरण साठी ५० लक्ष निधी स्थानिक आमदार निधीतून देण्यात आला असून लवकरच कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच उदय हिलटॉप हाऊसिंग सोसायटी, रावेत येथे ज्येष्ठ नागरिक केंद्र उभारण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक यांच्या अनेक दिवसापासून हक्काच्या जागेची मागणी करण्यात आली होती. त्या संदर्भात श्री. दिपक मधुकर भोंडवे यांच्या प्रयत्नाने आज प्रत्यक्षात त्यांच्या हक्काच्या जागेचा भूमिपूजन माननीय आमदार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित जेष्ठांनी आनंद व समाधान व्यक्त करत मान्यवरांचे आभार मानले. तसेच एक्झोटीका गृहंरचना संस्था, चंद्रभागा कॉर्नर रावेत येथे स्थानिक आमदार निधीतून खेळ मैदान याचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी लहान मुलांना उत्तम खेळ मैदान उभारण्यात आले असून सर्वांना याचे लाभ होणार आहे. माननीय आमदार अश्विनीताई जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्व: लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांच्या संदर्भ देत भविष्यात अजून नवीन विकास कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे असे सांगितले.
हेही वाचा – ऑलिम्पिक विजेत्या स्वप्नीलची राज्य सरकारकडून चेष्टा; स्वप्नील कुसाळेच्या वडिलांकडून खंत व्यक्त
याप्रसंगी माननीय शंकर जगताप यांनी उपस्थितांना संबोधित करताना अनेक लोकहित योजना असतील, वाहतुकीसाठी नवीन रस्ते प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग यांच्या प्रकल्प संदर्भात येत्या काळात होणाऱ्या कार्याची माहिती दिली. श्री दिपक मधुकर भोंडवे आणि श्री. सोमनाथ भोंडवे यांच्या संकल्पनेतून सदर कामे आमदार निधीतून करण्यात आली असून लवकरच पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही देण्यात आली.
या कार्यक्रमास श्री.दिवाणजी भोंडवे (पाटील), श्री.नंदकुमार भोंडवे, बाळासाहेब भोंडवे (मा. सरपंच), सौ.संगीताताई भोंडवे (मा. नगरसेविका), बाळकृष्ण भोंडवे (पाटील), श्री.पोपटशेठ भोंडवे,श्री. धोंडीमामा भोंडवे, राम भोंडवे, सतीश भोंडवे, दौलत पांडुरंग भोंडवे, सुरेश भोंडवे (पाटील), विनायक दादा भोंडवे, शांताराम भोंडवे, किरण भोंडवे, दिलीप भोंडवे, मनोहर भोंडवे, राजू भोंडवे, सागर भोंडवे, संजय पालेकर, सुधीर फडके, नरेंद्र सोनटक्के, नंदकुमार शिंदे, रजनीकांत भोंडवे, काळुराम भोंडवे, रमेश भोंडवे, प्रजापती जाधव, राहुल भोंडवे, कुणाल भोंडवे, विशाल भोंडवे, दादाभाऊ भोंडवे, अजय भोंडवे, सोमनाथ सोनटक्के, योगेश शिंदे, अभिजित भोंडवे, सतीश आप्पा भोंडवे, दशरथ भोंडवे, विलास भोंडवे (कामगार नेते), विलास भोंडवे (कामगार नेते), सागर भोंडवे संतोष आप्पा भोंडवे, दिलीप भोंडवे आदी प्रत्यक्ष उपस्थित होते.





