पाचपीर चौकात 50 रुपयांवरून बेकरीची तोडफोड
![Bakery vandalized at Rs 50 in Pachpir Chowk](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/crime-2-1.jpg)
पिंपरी चिंचवड | काळेवाडी येथील पाचपीर चौकात बेकरीमध्ये केक खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाचा आणि बेकरी चालकाचा 50 रुपयांवरून वाद झाला. यावरुन तीन-चार जणांनी मिळून बेकरीची तोडफोड केली. हा प्रकार बुधवारी (दि. 10) रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडला.पोलीस उपनिरीक्षक जितेन्द्र गिरणार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचपीर चौकामध्ये एक बेकरी आहे. या बेकरी मध्ये एक तरुण रात्री केक खरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी ग्राहक तरुण आणि बेकरी चालक यांच्यामध्ये 50 रुपयांवरून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन त्या दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर ग्राहकाने त्याच्या अन्य साथीदारांना बोलावून बेकरीची तोडफोड केली.
हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यात ग्राहक तरुण आणि त्याच्या साथीदारांच्या हातात कोयते आणि तलवार अशी शस्त्रे दिसत आहेत. तसेच बेकरी चालकाच्या हातात देखील शस्त्रे दिसत आहेत. याचा तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.