Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
कुदळवाडीतील बीआरटी रस्त्यावर ड्रेनेजच्या पाण्याची दुर्गंधी
![Bad smell of drainage water on BRT road in Kudalwadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/deenesh-Yadav-pcmc.jpeg)
दिनेश यादव यांची समस्या मार्गी लावण्याची प्रशासनाकडे मागणी
पिंपरी । प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून कुदळवाडीतील बीआरटी रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. त्याचा खूपच घाणेरडा वास येतो आहे. या रस्त्यावरून चारचाकी वाहन जाताना पाणी सगळीकडे उडते आणि कधी ते दुचकीस्वारांना, पादचाऱ्यासाठी त्रासदायक ठरते. या भागात शेवाळही जमा झाले आहे. त्यामुळे अपघातही होऊ शकतो.
महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील नागरिकांचे मत आहे. त्याची दखल घेऊन ‘ फ ‘ प्रभाग ‘ स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी ‘ क ‘ प्रभाग ड्रेनेज विभाग प्रमुखांची भेट घेतली. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ही समस्या लवकर सोडवण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडे यादव यांनी निवेदनाद्वारे केली.