Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आतापर्यंत सर्वात जास्त अपमान अजित पवारांचा झाला’; धनंजय मुंडे भावनिक

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत बैठक सुरू आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. आतापर्यंत सगळ्याात जास्त अपमान अजित पवार यांचा झाला, असं धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी ते बोलतना गहिवरले.

धनंजय मुंडे म्हणाले की, स्वाभिमानाचा पक्ष म्हणून आपण राष्ट्रवादी पक्ष समजतो. हा स्वाभिमान माझ्यासारखा आहे. घरातून आणि पक्षातून बाहेर काढलेल्या माणसाला आज तुमच्यासमोर बोलायचे. या ठिकाणी ताकद जर कोणी दिली असेल तर ती फक्त अजित दादा पवार साहेबांनी दिली. तुम्ही तुमच्या सावलीला सुद्धा तुमचा अपमान सांगितला नाही. कधी तरी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे लागेल. मला एक विश्वास आहे तुमची नियत सुद्धा साफ आहे.

हेही वाचा – गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का? छगन भुजबळांचा हल्लाबोल

प्रत्येक वेळेस त्यांच्यावर टीका झाली. पण त्यांनी साहेबांसाठी सगळं सहन केलं. आज या व्यासपीठावर बोलताना माझ्या डोळ्यात पाणी दिसत नसेल, पण माझं मन रडतंय. अजितदादांना किती वेदना सहन कराव्या लागल्या असतील, पण ते कधीही काहीही बोलले नाहीत. त्यांनी सगळं सहन केलं. अजित दादांना सर्वात जास्त वेदना सहन केल्या आहेत, असं धनंजय मुंडे म्हणाले.

नियती तुमच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. तुमच्या सगळ्यांच्या योगदानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढला. आपण संधी दिली आहे. आजही या बहुसंख्य लोकांची सावली म्हणून त्यांनी आपली आयुष्य ४५ वर्ष आपल्यासाठी या ठिकाणी घातली. आपणही त्यांच्यासाठी केलं. तुमच्यासाठी आणि पक्षासाठी केलं. माझ्यासारख्या नंतर आलेला माणूस हात जोडून विनंती करतो की लोकशाही वाचवा. तुम्हाला काय वाटतं. लोकशाही आहे ती तुम्हाला मान्य आहे का नाही, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button