Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुर्वेदिक डॉक्टरचे महिला पेशंट सोबत अश्लील चाळे

  • डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल


आळंदी | प्रतिनिधी 

एका आयुर्वेदिक डॉक्टरने महिला पेशंटसोबत तपासण्याच्या बहाण्याने अश्लील वर्तन केले. महिला पेशंटच्या तक्रारीवरून डॉक्टरच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 11) सकाळी आळंदी येथील प्रबोध निसर्ग उपचार केंद्र येथे घडली.

डॉ. गंगाधर नानासाहेब वाघे (वय 41, रा. स्वामी समर्थ नगर, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. वाघे आळंदी येथील प्रबोध निसर्ग उपचार केंद्र हा आयुर्वेदिक दवाखाना चालवतो. शनिवारी सकाळी फिर्यादी महिला आरोपीच्या दवाखान्यात गेल्या. डॉ. वाघे याने फिर्यादी महिलेचे पोट तपासण्याच्या बहाण्याने महिलेसोबत अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर डॉक्टरने पीडित महिलेला दमदाटी केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button