Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती सत्र आयोजित

पिंपरी :  प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) यांच्या सहकार्याने “कचरा वर्गीकरण व अस्वच्छतेचे दुष्परिणाम” या विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, आरोग्य व कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.

कार्यक्रमादरम्यान तज्ञांनी ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्व, योग्य कचरा व्यवस्थापन पद्धती तसेच अस्वच्छतेमुळे होणारे आरोग्यविषयक व पर्यावरणीय दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याचे व पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.

हेही वाचा –  शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग…थकित कर्ज रकमेची माहिती भरण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छ परिसर राखण्याची जबाबदारी, सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.

शाळेच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. शेवटी शाळेच्या व्यवस्थापन, प्राचार्य व शिक्षकवृंदांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन व यशस्वी अंमलबजावणीबद्दल सर्व सहभागींचे कौतुक केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button