थकबाकीदारांच्या 45 मालमत्तांचा लिलाव सुरू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोठ्या थकबाकीदारांच्या एकूण 41 निवासी आणि बिगरनिवासी मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया कर संकलन विभागाने सुरू केली आहे. या मालमत्तांचा लिलाव 30 जानेवारीला होणार आहे.
कर संकलन कार्यालयाने मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करून जप्त केल्या आहेत. तरीही मालमत्ताधारकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने त्या मालमत्तांचा लिलाव जाहीर केला आहे. एकूण 43 मालमत्तांची यादी कर संकलन विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यात 22 निवासी व 21 बिगरनिवासी मालमत्ता आहेत. मालमत्ताधारकांकडे 1 लाख ते 9 लाखांपर्यंतची थकबाकी आहे. त्यात बांधकाम व्यावसायिक, संस्था, व्यक्ती यांच्या निगडी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, पिंपरी भाजी मंडई, मोरवाडी, दापोडी, कासारवाडी, चोविसावाडी, चर्होली, वडमुखवाडी, संतनगर, मोशी, किवळे, मामुर्डी, रावेत, दिघी, वाकड येथील मालमत्ता आहेत.
हेही वाचा – भरधाव कंटेनरने 10 ते 12 गाड्यांना उडवले; चाकण शिक्रापूर रोडवर झाला अपघात
त्या 43 मालमत्तांची लिलाव मूल्य महापालिकेने जाहीर केले आहे. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कर संकलन कार्यालयात 30 जानेवारी दुपारी 3 पर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या मालमत्तेबाबत बोली लावायची असल्यास त्या मालमत्तेच्या मुल्याकनानुसार एक टक्का बयाना रक्कम डीडी स्वरूपात 30 जानेवारीपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. त्या पावतीशिवाय लिलावात भाग घेता येणार नाही. बोलीनंतर संबंधित मालमत्तेक्के रक्कम तात्काळ भरावी लागणार आहे.
त्यानंतर 20 दिवसांची मुदत संपल्यानंतर उर्वरित 80 टक्के रक्कम बोलीदारास जमा करावी लागेल. दरम्यान, लिलाव जाहीर झाल्यापासून 20 दिवसात थकबाकीदारांनी संपूर्ण थकबाकीसह लिलाव प्रक्रियेचा खर्च जमा केल्यास ती मालमत्ता लिलाव प्रक्रियेतून वगळ्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.