पोलिसात तक्रार दिली म्हणून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यावर हल्ला
![पोलिसात तक्रार दिली म्हणून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यावर हल्ला](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/marhan-talegaon-crime-news.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
कृषी विभागाच्या जागेवर गव्हाची पेरणी करत असलेल्या एका अधिका-यावर एका व्यक्तीने हल्ला केला. यात कृषी अधिकारी जखमी झाला आहे. संबंधित कृषी विभागातील अधिकाऱ्याने आरोपीच्या विरोधात यापूर्वी शासकीय जागेत झोपड्या बांधून राहत असल्याची पोलिसात तक्रार दिली होती. त्या रागातून आरोपीने हा हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 11) दुपारी पावणे पाच वाजता मावळ तालुक्यातील सुदवडी येथे घडली.
मधुकर रतिकांत जगताप (वय 42, रा. कीवळे) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामदास खाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदवडी गावात कृषी विभागाची जागा आहे. त्यात फिर्यादी हे मजूर लोकांकडून ट्रॅक्टरच्या सहाय्याने गव्हाची पेरणी करून घेत होते. त्यावेळी आरोपी रामदास खाडे तिथे आला. तो शासकीय जागेत झोपड्या बांधून राहत असल्याबाबत फिर्यादी यांनी यापूर्वी पोलिसात तक्रार दिली होती. त्याचा राग रामदास याच्या मनात होता. त्यातून त्याने फिर्यादी यांची गचंडी पकडून त्यांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
फिर्यादी यांनी ते करत असलेले शासकीय काम थांबवावे या उद्देशाने आरोपीने फिर्यादी यांच्या गालावर नखांनी ओरखडले. फिर्यादी यांना दुखापत करून यांचया शासकीय कामात व्यत्यय आणला व त्यांच्यावर हमला केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.