ऑक्टोबर अखेर शहरावर सात हजार ‘कॅमे-यांची’ नजर
![At the end of October, 7,000 'cameras' were watching the city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/cctv.jpg)
पिंपरी चिंचवड | स्मार्ट सिटीचे काम वेगाने चालू आहे. फॉयबर ऑप्टीक नेटवर्किंचे काम जोरात सुरु आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत तीन हजार कॅमेरे बसविले जाणार आहेत. मार्चअखेरपर्यंत 1500 कॅमेरे कार्यान्वित होतील. तर, महापालिकेच्या वतीने चार हजार असे एकूण सात हजार कॅमेरे शहरात बसविले जातील. ऑक्टोबर अखेर सात हजार कॅमेरे कार्यान्वित होतील, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी दिली.
महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ 13 मार्च रोजी संपला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी, पीएमपीएमएलवरील संचालकपद तसेच पीएमआरडीएवरील सदस्यत्व रद्द झाले. पिंपरी-चिंचवड स्मार्ट लिमिटेड कंपनीतील महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने त्यांचे संचालकपदही रद्द झाले. त्यामुळे काम करण्यास काही अडचण येणार नाही.
केंद्र सरकारचे प्रतिनिधी, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, पीएमपीएमपीएलचे अध्यक्ष, मी स्वत: संचालक मंडळावर आहोत. गणसंख्या होत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचे काम करताना कोणतीही अडचण येणार नसल्याचे सीईओ पाटील यांनी सांगितले.