पिंपरी / चिंचवड
संभाजीनगर येथे पादचारी तरुणीचा मोबाईल फोन हिसकावला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/mobile-snaching.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
सकाळी साडेनऊ वाजता रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणीच्या हातातील मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 23) संभाजीनगर, चिंचवड येथील साई अंब्रेला दवाखान्यासमोर घडली.
पूजा बाळू थोरात (वय 24, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी थोरात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास संभाजीनगर येथून पायी चालत जात होत्या. त्या साई अंब्रेला दवाखान्यासमोर आल्या असता त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी थोरात यांच्या हातातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.