पिंपरी / चिंचवड
जुनी सांगवी येथे दुकानदारास मारहाण करुन देशी दारू दुकान लुटले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/koyta.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
देशी दारू बार व बियर शॉपी चालवणा-यास बेदम मारहाण करून दुकानातून 35 हजारांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 18) सायंकाळी साडेपाच वाजता जुनी संगी येथे घडली.
देशी दारू बार व बियर शॉपी चालवणा-यास बेदम मारहाण करून दुकानातून 35 हजारांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 18) सायंकाळी साडेपाच वाजता जुनी संगी येथे घडली.
बबन रामराव खराटे (वय 26, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खराटे हे जुनी सांगवी येथील एम यु शितोळे नावाचे देशी दारू बार व बियर शॉपी चालवतात. शनिवारी सायंकाळी ते त्यांच्या दुकानावर असताना आरोपी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या दुकानात आले. एकाने फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करून मारहाण केली. दुस-याने दुकानाच्या काउंटरमधून दिवसभर जमा झालेली सुमारे 35 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर आरोपी पायी पळून गेले. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.