Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना रूग्ण संख्या वाढतीयं, बेड मॅनेजमेंट योग्य पध्दतीने करा; केंद्रीय पथकाच्या महापालिकेला सूचना

पिंपरी । प्रतिनिधी

कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील बेड मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे असे मत केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा दिल्ली येथील सफदरजंग मेडिकल कॉलेजचे निदेशक प्रा. डॉ. जुगल किशोर यांनी व्यक्त केले.

शहरातील कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्र सरकारच्या द्वीसदस्यीय  पथकाने पिंपरी चिंचवड शहराला भेट दिली.  दिल्ली येथील लेडी हार्डिंगे मेडिकल कॉलेजचे प्रा.डॉ. घनश्याम पतके यांचा या पथकात समावेश होता.  अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटल, महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये तयार करण्यात आलेली वॉररूम तसेच मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील आरटीपीसीआर चाचणी केंद्राला पथकाने भेट देऊन पाहणी केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button