उमेदवारी घोषित होताच श्रीरंग बारणेंची ‘डरकाळी’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Untitled-design-44-2-780x470.jpg)
पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची उमेदवारी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. महायुतीने मावळ लोकसभेत श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलं आहे. आता बारणेंचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यासोबत होणार आहे. उमेदवारी जाहीर होताच मी हॅट्रिक मारणार, असा दावा श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे.
श्रीरंग बारणे म्हणाले की, ही निवडणूक विकासात्मक निवडणूक आहे. देशामध्ये नरेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वास मिळवलेला आहे. तसेच गेल्या १८ महिन्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केलेला आहे. आणि मावळ लोकसभा मतदार संघात केलेल्या कामाच्या जीवावर जनता ही माझ्यासोबतच राहील असा विश्वास त्यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला आहे.
हेही वाचा – लोकसभा निवडणूक : शिवसेना शिंदे गटाकडून १२ संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित!
श्रीरंग बारणे म्हणाले की, शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे, भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकत पुन्हा मला उमेदवारी दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे. कामाच्याद्वारे लोकसंपर्काच्याद्वारे या निवडणुकीला सामोरे जात असताना येणाऱ्या निवडणुकीत शंभर टक्के माझा विजय होईल असा एवढा मला आत्मविश्वास वाटतो आहे.