breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

लोकसभा निवडणूक : शिवसेना शिंदे गटाकडून १२ संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित!

मावळातून श्रीरंग बारणे मैदानात : डॉ. श्रीकांत शिंदे डोंबीवलीतून पुन्हा लढणार!

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण अजूनही महायुतीमधून शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. अखेरीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. शिंदे गटाची संभाव्य यादी समोर आली आहे. महायुतीमध्ये भाजपाने आधीच 18 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडून अजितदादा पवार यांनीही सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

अखेरीस आता शिंदे गटातून 12 उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी आणि नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्याचे ठरले आहे.

उमेदवारांची संभाव्य यादी-

1) रामटेक – राजू पारवे 2) बुलढाणा – प्रतापराव जाधव, 3) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी, 4) हिंगोली – हेमंत पाटील, 5) कोल्हापूर – संजय मंडलिक, 6) हातकंणगले – धैर्यशील माने, 7) नाशिक- हेमंत गोडसे, 8) मावळ -श्रीरंग बारणे, 9) शिर्डी – सदाशिव लोखंडे, 10) दक्षिण-मध्य मुंबई – राहुल शेवाळे, 11) कल्याण-डोंबिवली – डॅा. श्रीकांत शिंदे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button