पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळताच भाजपने खरा चेहरा दाखवला- सचिन अहिर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/SAVE_20211209_222620.jpg)
पिंपरी, प्रतिनिधी-
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळताच भाजपने आपला खरा चेहरा उघड केला. गेल्या पाच वर्षात सत्ताधारी भाजपने महापालिकेत भ्रष्टाचाराचा कळस गाठला. येत्या महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेतून खाली खेचणे, हेच शिवसेनेचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केले.
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी गुरुवारी (दि.९) पिंपरी – चिंचवड महापालिकेस भेट दिली. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची शिष्टमंडळासह भेट घेत विविध नागरी प्रश्नांवर चर्चा केली. तत्पुर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना शहरप्रमुख अॅड.सचिन भोसले, महिला आघाडीच्या शहरसंघटक अॅड.उर्मिला काळभोर, गटनेते राहुल कलाटे, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, सहसंपर्वâप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक अमित गावडे, शहरसंघटक सचिन सानप उपस्थित होते.
सचिन अहिर म्हणाले, मुंबईच्या धर्तीवर पिंपरी – चिंचवडचा विकास करण्याचे सामथ्र्य केवळ शिवसेनेत आहे.शिवसेनेला मानणारा मोठा मतदारवर्ग पिंपरी – चिंचवडमध्ये आहे. आघाडी – युतीचा विचार करत न बसता स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी आरंभली आहे. आगामी काळात भाजपच्या भ्रष्ट कारभार जनतेसमोर मांडण्यात येईल, असेही सचिन अहिर म्हणाले.