Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी; अरुण पाडुळे यांची मागणी

पुण्यश्लोक राजमाता प्रतिष्ठानचे आंदोलन : पुण्यातील पर्वती येथील घटनेचा निषेध

पिंपरी | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून खालच्या पातळीवर असभ्य भाषेत सुनील उभे नावाच्या व्यक्तीने कमेंट व पोस्ट केली होती. या प्रकरणी त्याला काल पर्वती पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली असून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज पिंपरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या समोर निषेध आंदोलन करण्यात आले. या नराधमला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पुण्यश्लोक राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे यांनी केली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी हे समस्त धनगर बांधवांचे श्रद्धास्थान आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर या केवळ एक शासिका नव्हत्या, तर त्या धर्म, न्याय, सेवा, त्याग आणि मातृत्व यांचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श आजही अनेक प्रशासक व नागरिक घेतात. त्यांच्या जीवनातून मिळणारी प्रेरणा ही काळाच्या पलीकडची आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना इतिहासात ‘पुण्यश्लोक’ व ‘राजमाता’ ही उपाधी आदराने दिली गेली आहे.

हेही वाचा        :      एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी (डी) येथे “इंटरन्शिप व ऑन-द-जॉब ट्रेनिंग” कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

अशा आदर्श राजमातेबद्दल अपशब्द वापरणाऱ्या, समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाज कंठकाला कठोर शिक्षा व्हावी हीच समाज बांधवांची प्रमुख मागणी आहे.

यावेळी अरुण सर पाडुळे (अध्यक्ष- पुण्यश्लोक राजमाता प्रतिष्ठान), भरत महानवर, दिपक भोजने, शिवाजी घरबूडवे, गणेश पाडुळे, सागर कोपनर, शहाजीधन्ने, सुधाकर अर्जुन, विजय महानवर, राहूल मदने, अमोल महानवर, आकाश केळे, नागनाथ काळे, धनंजय गाडे, रेणुकाताई भोजने, अखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पिं.चिं. शहर अध्यक्ष संजय कांबळे, पिं. चिं. शहर सचिव श्रीकांत मलिशे, मुळशी तालुका अध्यक्ष आण्णा खोबरे, शैलेश इंचुरे आदि उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button