Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी (डी) येथे “इंटरन्शिप व ऑन-द-जॉब ट्रेनिंग” कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षण विश्व : विद्यार्थ्यांना उद्योगजगतातील प्रत्यक्ष अनुभव देऊन त्यांना सक्षम बनवण्याचा संकल्प

पिंपरी | एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी (डी), पुणे येथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “इंटरन्शिप्स अँड ऑन-द-जॉब ट्रेनिंग मीट” या एकदिवसीय कार्यशाळेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शुक्रवार, ११ जुलै २०२५ रोजी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत प्रायोजित होती.

विद्यार्थ्यांना उद्योगजगतातील प्रत्यक्ष अनुभव देऊन त्यांना सक्षम बनवणे या मुख्य उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत विविध सत्रांद्वारे रोजगारक्षमतेस चालना देण्यावर भर देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, विश्वशांती प्रार्थना व विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर डॉ. एम. ए. आतितकर (उपसंचालक) यांनी स्वागतपर भाषण केले, तर डॉ. बी. बी. वाफारे (संचालक) यांनी उद्घाटन सत्रात मनोगत व्यक्त केले.

दुसऱ्या सत्रात श्री. सचिन देशपांडे (संस्थापक व सीईओ, Erfinden Technology Pvt. Ltd.) यांनी “Workplace Skills for Interns” या विषयावर मार्गदर्शन करताना इंटर्न्ससाठी आवश्यक असलेली कौशल्ये, उद्योगातील प्रत्यक्ष अपेक्षा आणि वर्तमान आव्हानांवर सविस्तर चर्चा केली. तिसऱ्या सत्रात डॉ. देवीदास गोल्हार (संचालक – इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकजेस, एसपीपीयू) यांनी “आजच्या काळात इंटरन्शिप / OJT चे महत्त्व” या विषयावर आपले विचार मांडले. त्यांनी जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधींविषयी माहिती देत त्या संधींसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर भर दिला.

हेही वाचा     :    77 वर्षीय बेवारस मृत महिलेवर सप्तर्षी फाउंडेशनद्वारे अंत्यसंस्कार; सामाजिक सेवेला 15 वर्षे पूर्ण

कार्यशाळेच्या समारोप सत्रात सहभागी विद्यार्थ्यांना व आमंत्रित एचआर प्रतिनिधींना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. यावेळी एचआर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रश्नोत्तर सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी व उद्योगतज्ज्ञांनी संवाद साधला आणि आपले अनुभव शेअर केले.

विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा मार्गदर्शक…

या उपक्रमात १३६ विद्यार्थी, १५ हून अधिक प्राध्यापक व पुणे परिसरातील ३० पेक्षा जास्त एचआर व उद्योगतज्ज्ञ सहभागी झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळाली. ट्रेंड्स, कौशल्यांची गरज, व्यावसायिक वर्तन व नोकरीच्या संधींवर सखोल चर्चा झाली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. मंगेश भोपळे (अधिष्ठाता – प्रशिक्षण व नियुक्ती विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यशस्वी आयोजनासाठी श्रीम. सायली कोल्हटकर, श्रीम. ज्योत्स्ना पाटील, श्रीम. ममता चव्हाण, श्री. अक्षय महाजन, श्री. चेतन वाघ, श्री. मिलिंद शिंदे, प्रा. पल्लवी महागावकर व प्रा. माधुरी दरेकर आदींनी मोलाचे योगदान दिले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरली असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असा विश्वास सहभागी मान्यवरांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button