नेहरूनगर जम्बो रूग्णालयात 200 खाटांची व्यवस्था
![Arrangement of 200 beds in Nehru Nagar Jumbo Hospital](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Pune-beds-1-e1620271463970.jpg)
पिंपरी चिंचवड | कोरोनाची पुन्हा वाढत असलेली रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचे संकट यामुळे महापालिका वैद्यकीय विभागाने खाटा वाढविण्यास सुरुवात केली. नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवरील जम्बो कोविड रुग्णालयातील 200 खाटाकार्यान्वित केले जाणार आहेत.कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्य शासन, पीएमआरडीए, पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने नेहरूनगरचे जम्बो रुग्णालय उभारण्यात आले होते. त्यात ऑक्सिजन 816 खाटांची क्षमता होती. दुसर्या लाटेनंतर कोरोना रुग्ण संख्या घटली. त्यानंतर रुग्णालय बंद करण्यात आले. मात्र, जगात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला असून देशातही रुग्ण संख्या वाढत आहे. ओमायक्रॉनबरोबर कोरोना रुग्णसंख्येतही वाढ होऊ लागल्याची स्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा जम्बो कोविड रुग्णालय कार्यन्वित करण्याची तयारी केली आहे. या ठिकाणी 200 खाटा सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. अचानक रुग्ण संख्या वाढू लागल्यास हे रुग्णालयात उपचारसुविधा पुरविता येणार आहे. या ठिकाणी रुग्णालयाचे सर्व सुविधा, यंत्रणा उपलब्ध आहे. केवळ संचलन सुरू करावे लागणार आहे.
ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव व कोरोनाच्या तिस-या लाटेबाबत उपाययोजना करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे महापालिका स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सद्यस्थिती अस्तित्वात असलेल नेहरूनगरच्या जम्बो कोरोना रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहे. तेथे 200 खाटांची सुविधा केली जाणार आहे. त्यानुसार नियोजन सुरू आहे, असे महापालिकेचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी यांनी सांगितले.