स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केलं प्लाझ्मा दान; भारतीय जनता युवा मोर्चा वतीने ‘प्लाझ्मा दान’ मोहिम
![Approved member Dinesh Yadav donated plasma; 'Plasma Donation' Campaign on behalf of Bharatiya Janata Yuva Morcha](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/IMG-2021.jpg)
पिंपरी |
हॅलो, सर कोविड प्लाझ्मा हवाय असे अनेक फोन पिपंरी चिचंवड शहरातील सर्व रक्तपेढी येथे खणखणत आहेत. एकीकडे रुग्णालयात बेड, रमेडीसीवीर इंजेक्शनची कमरता जाणवत आहे. तर, दुसरीकडे रक्त बाटल्या अन् प्लाझ्माचीही तीच परिस्थिती आहे. त्यामुळेच, डोनरने पुढे येऊन प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे सातत्याने करत आहे. कुदळवाडीतील स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी कोरोनाच्या कठिणप्रसंगात आपली पॉझिटीव्ह दृष्टी समाजाला दाखवून दिलीय. कोरोनाच्या लढाईत दोन जीव वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. आता आपण एखादा जीव वाचविण्याच्या कामी येऊ शकतो, हे समजताच शहरातील रक्तपेढीत जाऊन अँटीबॉडीज चेक केल्यानंतर पहिला प्लाझा डोनेट करण्याचा निश्चय केला.
दिनेश यादव यांनी आपल्या कृतीतून जगण्याची सकारात्मक दृष्टीच दाखवून दिलीय. कोरोना संकटातही पॉझिटीव्ह विचारातून मदतीचा भाव त्यांनी जपलायं. तसेच, कोरोना महामारीच्या काळात आपण एखादा जीव वाचविण्याच्या कामी येतो, यापेक्षा मोठे पुण्य काय?. मी प्लाझ्मा डोनेट केल्याचा मलाच सर्वाधिक आनंद असल्याचे दिनेश यादव यांनी म्हटले आहे. यावेळी आमदार महेशदादा लांडगे, संकेत चोंधे, शिवराज लांडगे, उदय गायकवाड, प्रकाश चौधरी, अजित कुलथे, पुजा आल्हाट, मुक्ता गोसावी, गणेश जवळकर, प्रसाद कस्पटे, अमर लोंढे, अरूण गायकवाड, मंगेश घाडगे, संजय पटनी, प्रकाश चौधरी, आढाव, व भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
वाचा- #Covid-19: संकटाच्या काळात सेवाभावी संस्थांनी पुढे येवून काम करावे- जयंत पाटील