breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तृतीयपंथी सेलच्या शहराध्यक्षपदी किरण वाघ यांची नियुक्ती

पिंपरी । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) तृतीयपंथी सेल अध्यक्षपदी किरण बाळु वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.

आपण पक्षाचा व संघटनेचा अधिक विस्तार करुन दिलेली जबाबदारी निष्ठेने राष्ट्रवादी पार पाडाल. तसेच, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार शरद पवार यांचे विचार समाजातील तळागाळात पोहचविण्याचे यशस्वी प्रयत्न कराल, असे मत व्यक्त करत शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी किरण वाघ यांना भावी वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या आहे. तर, तृतीयपंथी यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी, तसेच सामाजिक विषयांवर काम करण्यासाठी राजकीय क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे किरण वाघ यांनी म्हटले आहे.

पिंपरी खराळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी पक्षप्रवक्ते फजलभाई शेख, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका वैशालीताई काळभोर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदिप  चिंचवडे,  पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष निलेश पांढारकर, चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संदिप चिंचवडे, भोसरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष उतमराव आल्हाट, राष्ट्रवादी लिगल सेल अध्यक्ष नगरसेवक गोरक्ष लोखंडे, ओबीसी शहराध्यक्ष विजय लोखंडे,  सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष विनोद कांबळे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, महिला बचतगट महासंघाच्या अध्यक्षा कविता खराडे, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा गंगा धेंडे, विद्यार्थी शहराध्यक्ष यश साने,  पदवीधर मतदार संघाचे शहराध्यक्ष माधव पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button