Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC | रील, गाणे, रॅपमधून करा मालमत्ताकर भरण्याचे आवाहन

मालमत्ताधारकांसाठी करसंकलन वाढवण्यासाठी अभिनव स्पर्धा

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरण्यासाठी रील, गाणे व रॅपच्या माध्यमातून आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी ‘मी जबाबदार करदाता’ रील-रॅप-गाणे बनवा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मालमत्ताकर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी करसंकलन विभागाने लाखोंचे बक्षीस जाहीर केले आहे. जे रीलस्टार, संगीतकार, रॅपर असतील, अशांनी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या कलेच्या माध्यमातून नागरिकांना मालमत्ताकर भरण्याचे आवाहन करावे, असे कर आकारणी व कर संकलन विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत सध्या मालमत्ताकर वसूल करण्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू असून थकबाकीदारांच्या थकीत रकमेवर प्रतिमहिना २ टक्क्यांचा विलंब दंडही वाढत आहे. त्याबरोबरच ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या पाणीपट्टीचा भरणा केलेला नाही, अशा मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित करण्याची कारवाईही सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ५०, ३० आणि २० हजारांचे पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

हेही वाचा  :  ‘आयआयबी’ मध्ये विद्यार्थ्यांचे सलग १५ तास अभ्यास करत ‘‘रेकॉर्ड’’

स्पर्धेत भाग घेण्यासाठी काय कराल…

  1. रील, गाणे, रॅप व्हिडीओ स्वनिर्मित असावा. इतरांच्या व्हिडीओमधील कोणताही भाग घेऊ नये, तसेच कॉपीराईट कायद्याचे पालन करावे.
  2. रील व्हिडीओ ओरिएन्टेशन पोर्टेट असावे.
  3. रील व्हिडीओ ६० ते ९० सेकंदांचा असावा.
  4. फेसबुक व इन्स्टाग्राम अथवा एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे किमान दोन हजारांवर फॉलोअर्स असणे आवश्यक आहे.
  5. रील्स स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वप्रथम नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणी फॉर्म मनपाच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  6. स्पर्धेचा कालावधी १ ते १५ फेब्रुवारी २०२५. स्पर्धकांनी १५ फेब्रुवारीपर्यंत आपले रील आपल्या आयडीवरून पोस्ट करून इन्स्टाग्रामवरील @pcmc_pimprichinchwad या अकाउंटला कोलॅब करा. याबरोबर, फेसबुक व एक्स या व्यासपीठावर पोस्ट केल्यास आमच्या फेसबुक @Pimpri Chinchwad Municipal Corporation व एक्सच्या @pcmcindiagovin या सोशल मीडिया हॅंडलला टॅग करा.
  7. आपल्या अंकाउंटवरून रील पोस्ट केल्यानंतर त्याची लिंक सदर [email protected] या ईमेलवर मेल करावी.
  8. आपण अपलोड केलेली रील, गाणे व रॅप यांचे दृश्य, आवाज स्पष्ट ऐकू व दिसेल, असा त्याचा दर्जा उत्तम असावा.
  9. रील्समधून धर्म, जात, पंथ यांच्या उल्लेखाने सामाजिक वातावरणास तेढ निर्माण होईल, असे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल, असे चित्रण असलेले रील्स ग्राह्य धरले जाणार नाहीत. याबरोबरच कोणाच्याही भावना दुखावतील, असा आशय असलेले रीलही स्पर्धेतून बाहेर होतील.
  10. रील्स स्पर्धेचा निकाल हा रील्सचे लाईक, दर्शकसंख्या (व्ह्यूव्ह्स), आशय, मांडणी, विषयाला दिलेला न्याय आदीवर ठरविला जाईल. स्पर्धेस निकालायोग्य प्रतिसाद आला नाही, तर स्पर्धा स्थगित करण्याचे स्वांतत्र्य आयोजकांकडे राहील.
  11. रील्स स्पर्धेबाबत निर्णयप्रक्रिया, बदल, निवड आदीबाबतचे सर्व अधिकार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडे राहतील.
  12. आपण स्पर्धेसाठी केलेले रील हे मालमत्ताकराबाबत जनजागृतीसाठी असून त्याचा इतर कुठेही वापर करण्यात येणार नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

चालू वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून करसंकलन विभागाची सुरू असलेली मालमत्ताकराबाबत थकबाकी वसुली मोहीम व मालमत्ता जप्ती मोहिमेबाबत माहिती मिळावी व नागरिकांनी वेळेत कराचा भरणा करावा, यासाठी रील, गाणे व रॅप या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

– अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button