“एसपीजी”मध्ये वार्षिक क्रीडा दिन जल्लोषात साजरा!
शिक्षण विश्व: शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वासाचा संदेश

पिंपरी-चिंचवड: एस.पी.जी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा दिन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा हा अत्यावश्यक घटक असल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथी पांडुरंगनाना गवळी यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात विधिवत सरस्वती पूजनाने झाली. स्वप्नील गवळी आणि प्रविण गायकवाड यावेळी उपस्थित होते. विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. लंगडी, रस्सीखेच, स्टिक द बॉल, क्रिकेट, कबड्डी अशा खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मैदानावर विद्यार्थ्यांचा उत्साह, खेळाडूपणा आणि संघभावना पाहण्यासारखी होती.
हेही वाचा – राष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी ऋतुराज आंब्रेची निवड
स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शाळेचे शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया मुळे यांनी केले.




