Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

राष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी ऋतुराज आंब्रेची निवड

शिक्षण विश्व: गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलकडून कौतुक

पिंपरी चिंचवड : गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, मोशी या संस्थेचा विद्यार्थी ऋतुराज आंब्रे याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. या उल्लेखनीय यशामुळे शाळा, पालक आणि शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत ऋतुराजने आपल्या वजनगटात प्रभावी प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याची निवड राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.

ऋतुराजने या यशामागे आपली सातत्यपूर्ण मेहनत, काटेकोर सराव आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. त्याचा दैनंदिन सराव सकाळ-संध्याकाळ शाळेच्या मैदानात आणि जिममध्ये होत असतो. त्याच्या या समर्पणामुळेच त्याने राज्यभरातील स्पर्धकांना मागे टाकत राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले.

हेही वाचा –  “रीड टू लीड” मधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन!

या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष विनायक भोंगाळे साहेब कविता भोंगाळे यांनी ऋतुराजचे अभिनंदन करताना सांगितले, “ऋतुराजने आमच्या शाळेचा अभिमान वाढवला आहे. त्याची मेहनत आणि चिकाटी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.” तसेच क्रीडा शिक्षक- समाधान माने यांनी सांगितले की, “ऋतुराजने अत्यंत शिस्तबद्धपणे सराव करून हे यश संपादन केले आहे. त्याच्याकडून राष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.”

ऋतुराजच्या या यशामुळे त्याचे पालक, मित्र आणि संपूर्ण शाळा परिवार अत्यंत आनंदित आहेत. शाळेच्या व्यवस्थापन समितीने त्याचे कौतुक करून त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.ऋतुराज आता राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शाळेचे प्रतिनिधित्व करणार असून, त्याच्याकडून उत्कृष्ठ कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

ऋतुराज आंब्रे याचे परिश्रम, आत्मविश्वास आणि शाळेचे मार्गदर्शन या तिन्हींच्या जोरावर त्याने आपले स्वप्न साकार केले आहे. त्याचे हे यश सर्वांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

– कविता भोंगाळे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button