Animal Theft : भोसरीतून कुत्रा चोरीला
पिंपरी / महाईन्यूज
भोसरीत कुत्रा चोरीला गेला आहे. एका रिक्षाचालकाने कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधून रिक्षामधून घेऊन जाताना एका महिलेने पाहिल्यानंतर भोसरी पोलीस ठाण्यात याची तक्रार देण्यात आली आहे. प्राण्यांचा छळ केल्याचा ठपका ठेवून अज्ञात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 4) सकाळी भोसरीतील लांडगेनगर येथे घडला आहे.
याप्रकरणी निता उत्तम पंडित (वय 33, रा. संतनगर, सेक्टर 4, स्पाईन रोड, मोशी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती सोनार यांनी परिसरात नेहमी वावरणा-या कुत्र्याला एका रिक्षाचालकाने गळ्यात पट्टा बांधून मारहाण करताना पाहिले. थोड्या वेळानंतर त्याने कुत्र्याला रिक्षामधून घेऊन जाताना पाहताच त्यांनी इतर महिलांना हे सांगितले. त्यावर निता पंडित यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.