अन् त्यांची दिवाळी गोड झाली!
माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांच्या हस्ते सफाई कामगार, आशा सेविका दीपावलीनिमित्त सन्मानित

पिंपरी चिंचवड : दिवे लावून घर उजळते. पण माणसांच्या हास्याने समाज उजळतो. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि एकत्रतेचा उत्सव आहे. म्हणूनच या उत्सवामध्ये आपले रोजचे जीवन स्वच्छ आनंददायी आणि सुकर करणाऱ्या हातांचा सन्मान कोणी गरजेचे आहे असे मत माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
दिवाळी सणाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक १२ मधील सफाई कामगार, घंटागाडी कामगार, ड्रेनेज सफाई कर्मचारी, आशा सेविका, अंध नागरिक, तसेच बचत गटाच्या समन्वयक व सहाय्यक महिलांचा माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांच्या वतीने दिवाळी भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
भालेकर यावेळी म्हणाले या उपक्रमाद्वारे समाजातील प्रत्येक घटकाला आनंदाचा स्पर्श मिळावा आणि त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी, हा उद्देश होता. या निमित्ताने कामगारांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू पाहून आयोजकांना मनस्वी समाधान लाभले. या सर्व मेहनती हातांमुळेच शहर उजळते, परिसर स्वच्छ राहतो आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होते. या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भेटवस्तू देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळाली.
हेही वाचा – ‘सागरी क्षेत्रात ५६,००० कोटींच्या गुंतवणुकीची वचनबद्धता’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कार्यक्रमास रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष वसंत पतंगे, अध्यक्ष प्रभाकर चौधरी, लक्ष्मण गुरसाळी, रमेश पाटोळे, कॅप्टन कदम, अरुण वाळुंजकर, त्र्यंबक गायकवाड, सुदामराव शिंदे, बाबुराव लहाने, कोंडीबा भालेकर, रमेश भालेकर, पांडुरंग भालेकर, शिरीष उतेकर, दीपक बोर्डे, गजानन वाघमोडे, रवी एकशिंगे, हनुमंत कलमोरगे, रामभाऊ भालेकर, ज्ञानेश्वर माऊली भालेकर, पंढरीनाथ भालेकर, अनिल भालेकर, अमोल भालेकर, दिगंबर भालेकर, राजाराम भालेकर, सुनील भालेकर, सुनील आमने, बाळासाहेब तुपे, मधुकर भालेकर, संभाशेठ भालेकर, रविराज शेतसंधी, अरविंद साळुंखे, महेश भालेकर, मंगेश नखाते, शरद गोपाळ भालेकर, अजित संभाजी भालेकर, संतोष पवार, बबन चव्हाण, सागर चव्हाण, रामदास कुटे, सोमनाथ मेमाणे, रामदास गवारे, रोहिदास भालेकर, सागर भालेकर, विजय थिटे, बबन भालेकर, शिवाजी बिटके, भानाशेठ भालेकर, के के भालेकर, शरद नारखेडे, सनी पवार, दत्तात्रय घोडके, अस्मिताताई भालेकर, शितलताई वर्णेकर, वैशाली भालेकर, मंगल भालेकर, संगीताताई भालेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विलास आबुज, दत्ता चव्हाण, स्वप्निल वाघमारे, नारायण माळी, सचिन गायकवाड, दिग्विजय सवाई, कमलेश भालेकर, तुषार भालेकर, निलेश भालेकर, अभिषेक भालेकर, हर्षल भालेकर, सचिन भालेकर, संतोष निकाळजे, प्रदीप जैसवाल आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम खेडकर यांनी केले.



