पिंपरी / चिंचवडपुणे

मावळात दोन मित्रांमध्ये वाद; एकाचा गोळ्या झाडून खून

पिंपरी l प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून दोन मित्रांमध्ये भांडण झाले. एकाने दुस-या मित्रावर धारदार हत्याराने वार केले. यात जखमी झालेल्या मित्राने देखील पिस्तूल काढत थेट मित्रावर तीन गोळ्या झाडून त्याचा खून केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 21) सकाळी अकरा वाजता मावळ तालुक्यातील आंधळे खुर्द गावात घडला आहे.

रोहन येवले (वय 21, रा. आढले खुर्द, मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अविनाश भोईर (वय 23, रा. आढले खुर्द, मावळ) हा गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश भोईर आणि मयत रोहन येवले हे एकमेकांचे चांगले मित्र होते. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. त्या भांडणाचे कारण अद्याप समोर आले नाही. त्याच रागातून आज पुन्हा दोघांचे भांडण झाले. रोहन याने अविनाशवर धारदार शस्त्राने वार केले. त्यात अविनाश जखमी झाला. त्यानंतर अविनाश याने पिस्तूल काढले आणि रोहनवर तीन गोळ्या झाडत त्याचा खून केला.

जखमी अविनाश याला हिंजवडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आढले खुर्द गावात आणि हॉस्पिटल परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पुढील तपास शिरगाव पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button