ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवड

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना अभिवादन करण्यासाठी चिंचवडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी (दि.१४) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी विरोधकांनाही कधी अंतर दिले नाही. शहरात अनेक कार्यकर्ते घडवले. त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. अनेकांना नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर केले. शहरातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, औद्योगिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये आदरस्थानी असणारे ते शहरातील एकमेव नेते होते. त्यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार भाई जगताप, माजी राज्यमंत्री व आरपीआयचे (आठवले गट) राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर, निवृत्त विभागीय आयुक्त व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त दिलीप बंड यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय आमदार व नेते उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व अन्य संस्था, संघटनांचे पदाधिकारीही लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button