Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराष्ट्रिय

अजित पवार यांनी केले भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

पिंपरी-चिंचवडः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (5 जानेवारी) भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दरम्यान, अजित पवारांनी आज लक्ष्मण जगताप यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

यावेळी लक्ष्मण जगतापांचे लहान भाऊ शंकर जगताप हे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या बाजूला बसले होते. मात्र लक्ष्मण जगतापांचे मोठे बंधू विजय जगताप तिथं नव्हते. हे पाहून अजित पवारांनी त्यांनाही बोलावून घेतलं. मग एकामागोमाग एक घरातील सर्व मुला-मुलींना बोलावून घेतलं. ते आत्ता काय करत आहेत. शिक्षण घेत असतील तर कोणतं घेत आहेत? व्यवसायात असतील तर तो कसा करतायेत? संसारात असतील तर तो कसा सुरु आहे. याबाबत इत्यंभूत माहिती घेतली आणि वडिलकीच्या नात्याने त्यांना मोलाचा सल्ला दिला. त्यानंतर घरात जाऊन कुटुंबातील महिलांशीही त्यांनी संवाद साधला. लक्ष्मण जगताप 2014 मध्ये भाजपमध्ये गेले असले तरी त्यांचे दादांसोबत असणारा जिव्हाळा नेहमी दिसून आला. आज त्याची प्रचिती या निमित्तानेही आली.

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं 3 जानेवारी रोजी निधन झालं. लक्ष्मण जगताप हे दीर्घ काळापासून आजारी होते. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मण जगताप यांना कर्करोगाने ग्रासलं होतं. त्यांच्यावर नियमित उपचार सुरु होते. मात्र त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. लक्ष्मण जगताप हे तीन टर्म पिंपरी-चिंचवडचे आमदार होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button