ऐश्वर्या गायगवाल यांचा दुबईत अल जरुनी पुरस्काराने सन्मान
![Aishwarya Gaigwal honored with Al Jaruni Award in Dubai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/0bfd274b-d9df-41dd-b486-c0962fa055a4.jpg)
—- ऐश्वर्या यांनी रेखाटलेल्या पेंटींगचे दुबई पॅलेसमध्ये कौतुक
पिंपरी|प्रतिनिधी
पिंपळे गुरव -नवी सांगवी परिसरातील कलाकार ऐश्वर्या दीपक गायगवाल यांचा नुकताच दुबई येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.त्याचबरोबर उत्कृष्ट कामगिरी बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘certificate of Achievement 2022’हे प्रमाणपत्र सुद्धा यावेळी देण्यात आले.
His Excellency vision towords future (यांची महामहीम दृष्टी फ्युचरकडे या विषयावर तिने कॉन्सेप्ट तयार करून एक उत्कृष्ट पेंटिंग तयार करण्याचे ठरविले.पेंटिंग साठी ऐश्वर्या यांना दोन महिन्यांचा कालावधी लागला.कॉन्सेप्ट तयार करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला.आणि ती कॉन्सेप्ट कॅनवास वर उतरविण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला.तसेच कॅनव्हास साईज 30 बाय 40 असून त्यावर ॲक्रेलीक रंगांचा वापर करून ती पेंटिंग पूर्ण केले आहे.His Excellency Suhail Mohd Al Zarooni त्यांच्या बर दुबईमधील पॅलेसमध्ये नुकतेच चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते.त्यामधून ऐश्वर्या यांचे पेंटिंग उत्कृष्ट पेंटिंग म्हणून निवडले गेले.ऐश्वर्या यांना बर, दुबई येथे येण्यासाठी निमंत्रण पाठविण्यात आले होते.आपल्याला अवॉर्ड मिळेल याची त्यांना पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती.
दरम्यान हे पेंटिंग त्यांच्या तयार होत असलेल्या म्युझियममध्ये लागणार आहे.
आपल्या वाटचालीविषयी माहिती देताना ऐश्वर्या गायगवाल म्हणाल्या की, माझे शिक्षण Fine Arts, 5 years in Dipolma अभिनव कला महाविद्यालय टिळक रोड, पुणे येथेन पुर्ण केला असून मी सध्या [Byjus Company मध्ये Media And Entermaint Department Concept Artist म्हणून काम करते. तसेच मराठी चित्रपटांमधून आर्ट डिरक्शन व चित्रपटाचे पोस्टर डिझायन करते.
मला लहानपणापासून कलेविषयी खुप आवड होती. मी लहानपणी सर्व प्रकारचे चित्रकला करायची मी दोन तास चित्रकलेसाठी घालवयाची आवड म्हणून मी चित्र काढायची. वयाच्या सातव्या वर्षापासून मी सुंदर चित्र काढायचे. मी जया समोरचे चित्र आहे तशा तशाच हुबेहुब चित्र काढायचे. मोठा गट ते दहावी पर्यंत शाळांमधून ज्या चित्रकला स्पर्धा व्हायच्या त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवाचये तसेच शाळांमधील चित्रकलेल्या गर्व्हरटमेंटच्या परिक्षामधून सुध्दा मी ऐ ग्रेड प्राप्त केले. आणि त्यावेळेपासून असे ठरविले की चित्रकला या क्षेत्रामध्ये आपले भविष्य उज्वल करायचे असे मी ठरविले आणि माझ्या आई-वडिलांचा पण मला माझ्या चित्रकला शिक्षणामध्ये हा शिक्षकांचा व आई वडिलांचा पुरेपुर सहभाग होता, मला या क्षेत्रात प्राविण्या मिळण्यासाठी ९ वर्षाचा कालावधी लागला सतत सराव, मेहनत, कष्ट केल्यामुळे मला ही प्रगती प्राप्त झाली.
माझा डिप्लोमा पुर्ण झाल्यानंतर मी अनेक वेगवेगळे कोर्स पुर्ण केले. की एफ एक्स मोशन ग्राफिक्स, अॅनिमेशन बॅगग्राउंड, तसेच मी स्वतः चे श्री आर्ट या विषयाचे युट्युब चॅनल ओपल केले त्याचे नाव Ash Techno Art असे चॅनल आहे त्यावर लोकांनी मला भरभरून प्रतिसाद दिला.
तसेच नामवंत कलाकरांना त्याचे पोटरेट गिफ्ट करत असत. तसेच मी एका वर्ल्ड बुक ऑफ धारक डॉ. आदित्य पतकराव यांना पोटरेट गिफ्ट केले.
माझा पहिलाच अनुभव होता परदेशात जाण्याचा आणि दुबईचा प्रवास हा मी एकटीनेच केला ५ दिवसाचा प्रवास होता. महाराष्ट्रामध्ये हा पुरस्कार मलाच मिळाला आहे. आणि अल जरूनी यांनी भारताचे आणि महाराष्ट्राचे कौतुक केले ही आपल्यासाठी खुप अभिमानाची गोष्ट आहे
” मला या क्षेत्रात प्राविण्य मिळण्यासाठी ९ वर्षाचा कालावधी लागला. सतत सराव, मेहनत, कष्ट केल्यामुळे मला ही प्रगती प्राप्त झाली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल .हा माझ्या पेंटिंग कलेचा गौरव आहे.
— ऐश्वर्या गायगवाल