पिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये नागरिकांशी आपुलकीचा संवाद

मिशन-PCMC: प्रभाग क्रमांक 28 मध्ये भाजपाला भक्कम पाठिंबा

पिंपरी चिंचवड : पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांशी झालेल्या भेटीगाठी व संवाद केवळ जनसंपर्कापुरते मर्यादित न राहता, जनतेशी निर्माण झालेले आपुलकीचे आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारे ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रत्येक भेटीतून नागरिकांचे अपार प्रेम, विश्वास आणि सकारात्मक पाठिंबा प्रकर्षाने जाणवत असून, पक्षाबद्दल तसेच नेतृत्वाबद्दल जनतेने व्यक्त केलेली माया आणि साथ मनापासून कृतज्ञ करणारी असल्याची भावना भाजपाकडून व्यक्त करण्यात आली.

यावेळी स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे चिरंजीव आदित्य लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपळे सौदागर परिसरातील विविध सोसायट्यांमधील नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विकासकेंद्रित धोरणांची माहिती देत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचे विचार आणि कार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

हेही वाचा –  भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक २५ मध्ये विकासाचा संवाद

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना आदित्य जगताप यांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले. पिंपळे सौदागरमधील नागरिकांनीही विकासाच्या मुद्द्यांवर भाजपाला पाठिंबा दर्शवत सकारात्मक प्रतिसाद दिला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button